रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४३वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती

अभंग ४३

वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥

भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥

देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥

तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥

अर्थ :- भूमी, राज्य, द्रव्य यांच्या लोभान जो हरिभक्ति करतो त्याला देव भेटत नाही. हे निचित जाणावें।।1।।

हमाल पाठीवर ओझे वाहतो, पण त्याच्या ओज्यामधील कोणत्याही वस्तुचा त्याला लाभ होत नाही।।ध्रु।।

मनामधे इच्छया-आकांक्षा देवाची पूज्या करणारा पाश्याणासारखा असतो. असा पाश्यानच पाश्याणाची पूज्या करतो।।2।।

मनामधे विषयाचि लालसा धरून केलेले कर्मे हे वेष्याच्या शिंदळकि प्रमाणे असत्तात, असे तुकोबा म्हणतात ।।३।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा