रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५२श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी

अभंग ५२

श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥

नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥

माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥

तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥३॥

अर्थ :- तकोबा म्हणतात, शीघ्रकोपि मनुष्य स्वता:च्या नाश करून घेतो, तो कुत्र्यप्रमाने असतो ।।1।।

ज्याला दुसर्याचा आदर करता येत नाही, आणि ज्याच्याकडे धैर्य नसते, त्याला कितीही उपदेश केला तरी तो वाया जातो ।।ध्रु।।

माणसांना तो अपशब्द बोलतो म्हणून त्यावर लोक थुंकतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, आशा अमंगळ रुत्तिच्या लोकांची फजीति करावी ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा