रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५८न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ

अभंग ५८

न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ   ॥१॥

तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥

न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥२॥

तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥

अर्थ :- ज्याच्या नेत्रांमध्ये परमेश्वराबद्दल प्रेमाने पानी येत नाही, ज्याच्या अंतरि भक्तिचि तळमळ नाही ।।1।।

त्याचे बोल हे वृथा लोकांना रंजविनारे असतात ।।ध्रु।।

आणि अश रंजक बोल निष्फळ ठरतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, माला भेटन्यासाथी, माझे बोल आइकन्यासाठी ज्याणा लाज वाटते, त्या नास्तिक लोकांची आम्हाला आवश्यकता नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा