रविवार, २ ऑगस्ट, २०१५

२९माजी पाठ करा कवी । उट लावी दारोदारा

अभंग नं २९

माजी पाठ करा कवी । उट लावी दारोदारा ।।1।।

तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ।।2।।

उष्टावळी करुनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ।।3।।

तुका म्हणे बाहेरमुदि । आहाच गोविंदी न सरती।।4।।

अर्थ :- आपल्या काव्यात काव्यगुण नसताना  अनुप्रसाचा आवर करुण काहीजण कविता रचतात आणि माजी कविता पाठ करा असे दारो दारी जाउन लोकांच्या मागे लागतात ।।1।।

जे जानकार आहेत, ते त्यांची योग्य ती पारख करतात. मग तेथून जाताना त्या स्वताला कवी म्हणवनार्याची मान लाजेने खाली जाते ।।2।।

उष्टावळी जमा करुण बळेच प्रेमाचा आव आंनतांत ।।3।।

अश्या वरकरनि भगवंतभक्तांच्या देखावा करणारे गोविंदचरणी लीन होत नाहीत, असे तुकाराम माहाराज म्हणतात।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा