रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४६ढेकरें जेवण दिसे साचें

अभंग ४६

ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥

हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥

गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥२॥

तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥

अर्थ :- भोजनाच्या तृप्तिनंतर दिलेली ढेकर खरी असते, पण भोजन न करता दिलेली ढेकर हे ढोंग असते ।।1।।

भोजन करुन तृप्तिने दिलेली ढेकर हा अनुभव असतो, तर भोजन न करताच दिलेली ढेकर हा दिखाउपन असतो ।।ध्रु।।

गवहाच्या पीठचि पुरणपोळी बनते, म्हणून केवल पीठ खल्याने पुराणपोळी कल्ल्यआचा अनुभव येत नाही ।।2।।

म्हणून तुकोबा म्हणतात, हातात कांकण दिसत असता आरसा पहने निरर्थक ठरते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा