गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

९६मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा

अभंग ९६

मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥१॥

म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्‍याचें तोंड ॥ध्रु.॥

समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥

तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥

अर्थ :- एका विवाही प्रसंगी नवरा-नवरी वेळेवर आले नाहीत म्हणून एक म्हातारा मधे बोलू लागला ।।1।।

नवृ वेळेवर एत नाहीसे पाहुन तो म्हातारा त्या नवरीला 'त्या रांडेला आना' आणि त्या 'नावर्याचे तोड़ पेंटून दया' अशी अशुभ वार्ता करू लागला ।।ध्रु।।

कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हातार्याला कळाले नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, आशा मुर्ख महतर्याला मंडवातून प्रथम दूर करा ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा