शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

६८भक्तॠणी देव बोलती पुराणें

अभंग ६८

भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥

मागें काय जाणों अइकिली वार्त्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥

माघारिया धन आणिलें घरासि । न घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥

नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥

प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥

बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥५॥

तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तो चि एक ॥६॥

अर्थ :- देव भक्तांचा ऋणी आहे, भक्तांनी आपल्या भक्तिन त्याला बांधून टाकले आहे, असा संकेत आहे ।।1।।

पूर्वीची अशी गोष्ट सांगितली जाते, की संत कबीरांनी विंलेली वस्त्रे बाजारात नेउन वाटली तेव्हा एक माणूस वस्त्रा साथी विनावनि करीत असतांनी आढळला, तेव्हा कबीरांनी आपल्या आंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिल ।।ध्रु।।

तो वस्त्रहीन मनुष्य साक्षात परमेश्वर होता ।।2।।

संत नंदेवांना पण असाच अनुभव अला. त्यांचेही धन परमेश्वराने ब्राम्हणाकडून लुटविले ।।3।।

या सर्व प्रतक्ष घडलेल्या कथा आहेत, एकनाथांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठीसुध्दा विठ्ठलाने नाथांच्या घरी पानी भरले, कस्ट केले ।।4।।

शेतात पेरन्यासाठी आलेले बी दळून नाथांने पणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिल ।।5।।

तुकोबा म्हणतात, माझ्या विठ्ठला बद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून पार पडू शकत नाही ।।6।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा