रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५७योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें

अभंग ५७

योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥

अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥

मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥

तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥

अर्थ :- जो इंद्रियांचे दमन करतो, ज्याच्या चित्तामद्धे क्षमा आहे तो योगी असतो ।।11।।

त्यामुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ति होते ।।ध्रु।।

ज्या प्रमाणे स्वत:च्या शेतातसुद्धा कष्ट केलताशिवाय पिक येत नाही ।।2।।

म्हणून तुकोबा म्हणतात, योग्य-अयोग्य जाणून घ्या , नाहीतर वृथा शीन कशाला ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा