गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

१०६बोललों तें कांहीं तुमचिया हिता

अभंग १०६

बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥

वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥

निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥२॥

तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥३॥

अर्थ :- मी तुम्हाला तुमच्या हिताची काही सांगतांना अधिक-उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा ।।1।।

जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसु नये; नाहीतर आपलेच नुक्सान होते।।ध्रु।।

वैद्याने पोटशूलावर कडूनिंबाचा रस दिला, तर तो पोटात न घेता पाटा  वर चोळला तर रोग बरा होणार नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मुर्ख मात्र संकताच्या गर्तेत कोसळतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा