गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

८८पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा

अभंग ८८

पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥

ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥

आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥

तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥

अरथ :- पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती बर्णन करावा टेवाढा थोडाच् आहे ।।1।।

या ठिकाणी भक्तांना भेटन्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे ।।ध्रु।।

इतर क्षेत्र बर्याच कालानंतर फळ देणारी आहे ।।2।।

तुक9बा म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची पेठ, वैकुंठच आहे ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा