शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

६६तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ

अभंग ६६

तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥

कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥

मानदंभासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥

तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥

वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥

तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥५॥

अर्थ :- हे साधका, समज्यात कर्मकांडाला महत्त्व देणारे तीळ, तांदूळ यज्ञ करुण तू होमामधे जाळतोस, पण स्वत:च्या स्वभावातील काम-क्रोधादी शत्रु मात्र तू तसेच ठेवतोस ।।1।।

यज्ञयागादि कर्मकांडमध्ये व्येर्थ का शिणुन जातोस, त्यापेक्षा पांडुरंगाची सेवा का करात नाहीस? ।।ध्रु।।

समाजात मानसंन्मान मिळविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी ग्रंथपठण, विद्याध्ययन करण्याचे कृत्य तू करतोस ।।2।।

तीर्थाटन करुण स्वत:विषयी अभिमान वाढविलास ।।3।।

दानधर्म करुण आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करुण, अहंकार बाळगलास ।।4।।

तुकोबा म्हणतात, की हे कर्मकांड म्हणजे अधर्माचे वर्म आहे ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा