रविवार, २ ऑगस्ट, २०१५

६४सुख पाहतां जवापाडें

अभंग ६४

सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥

धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥

नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥

तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥३॥

अर्थ :- जीवनात सुख हे फार थोड़े असते, दुःख मात्र पर्वतायेवढे असते ।।1।।

ते दुःख कमी करण्यासाठी संतवचन, संत्सहवास आवश्यक असतो ।।ध्रु।।

मनवाच्या आयुष्याचि अर्धी वर्ष रात्री झोपन्यात जातात, बाकीचे बालपन, म्हतारपणात, आजारपनात जातात ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्खा, असे आयुष्य निरर्थक गेले तर जन्म-मृत्युच्या घाण्यामध्ये तू बैलासरखा फिरत राहशील ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा