रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५५माझी पाठ करा कवी

अभंग ५५

माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥

तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥

उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥

तुका म्हणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥३॥

अर्थ :- आपल्या काव्यात काव्यगुण नसतांना अनुप्रासाचा वापर करून कहीजण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा आशे दरोदारी जाउन लोकांच्या मागे लागतात ।।1।।

जे जानकार आहेत, ते त्यांची योग्य टी पारख करतात. मग ते तेथून जातांना त्या स्वत्:ला कवी म्हणावणार्यांची मान लाजेने खली जाते ।।ध्रु।।

उष्ठावळी जमा करुण बळेच प्रेमाचे आव आनतात ।।2।।

अश्या वरकर्णि भगवंतभक्तिचा देखावा करणारे भगवंत चरणी लिन होत नाहीत, असे तुकाराम महाराज म्हणतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा