रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५९बाईल सवासिण आई

अभंग ५९

बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥

थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥

विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥

तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥

अर्थ :- एका ढोंगी, कर्मठ मनुष्याने आपल्या माता-पित्याचे श्राद्ध घातले, आईसाठी सवासिन म्हणून आपल्या बायकोला बसवले व वडिलांच्या जाएगी ब्राम्हण म्हणून आपणच बसला ।।1।।

त्या मुळे त्याचे श्राद्ध निष्फळ झाले; कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत ।।ध्रु।।

ऎसे विषयलोलुपता गृहस्थ स्वत:च्या जीवनाचा नाश स्वतःच करूँ घेतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, असे पाखंडी, अहंकारी, अश्रद्ध लोक दगडालाच देव मानतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा