रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३०उपाधिच्या नावे घेतला सिंतोडा नेदूं आतां पीड़ा आतळों ते

अभंग नं ३०

उपाधिच्या नावे घेतला सिंतोडा नेदूं आतां पीड़ा आतळों ते ।।1।।

कश्यासाठी हाथ भरोनि धुवावे । चालतिया गावे मारगासी ।।2।।

काय नाही देवें करुनि ठेविलें ।असे ते आपुले ते ते ठायी ।।3।।

तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार । तेव्हां अपपर बोळविले।।4।।

अर्थ :- प्रायचिताने अस्पुश्यता निवारण करता येते, तदवत प्रपंचातील उपाधिपासून सुटका होण्यासाठी ज्ञान शिंतोडा मी उडन घेतला अत्ता पपंच्याची पीड़ा मला दुःख देत नाही ।।1।।

भक्तिमार्ग हाती धरलेला असतांना कश्या साथी एखाद्या अमंगळ वस्तुला स्पर्श करुण हात धुवावे ।।2।।

या विश्वा मधे परमेस्वराने जे जे निर्माण केले आहे ते ज्ञानदृष्टिने पाहिले असता आपल्या हिताचे आहे हे कळते ।।3।।

तुकोबा म्हणतात, अशी ज्ञानदृष्टि प्राप्त होण्यासाठी अहंकाराचा नाश झाला पाहिजे. माझा अहंकार गेला म्हणजे आपले - परकेचा भेदच संपला ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा