शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७३कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी

अभंग ७३

कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥

हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥

नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥२॥

वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥३॥

तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥४॥

  अर्थ :- ज्यांच्या कंठाटुन कृष्णनाम येत नाही ती वाणी अशुभ आहे ।।1।।

अशी व्यक्ति परमार्थ मार्गात अमंगळ मानली जाते ।।ध्रु।।

जे हात दान देण्यास पुढे होत नाही ।।2।।

अश्या नास्तिक मनुष्यास संत जवळ करीत नाहीत, त्याला कड़क शब्दात सुनावितात ।।3।।

तुक9बा म्हणतात, ज्याच्या आचारनामद्धे ताळमळ नाही, त्याला अवकळा प्राप्त होते ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा