गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

८९तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं

अभंग८९

तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥

मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥

तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥

तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥

अर्थ :- सर्व तीर्थक्षेत्रांवर दगाडाचा देव व तीर्थाचे पानी दिसते; पण तुकोबा  संतसज्जनांमधे देव दिसतो ।।1।।

अश्या संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहहि अर्पण करावा ।।ध्रु।।

तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही. जर मनमधे भक्ति भावना असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते, म्हणून संतसज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतित बदलून टाकतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, संतसज्जनांमद्धे जीवनातील त्रिविध तापांची होळी होते ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा