गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

९१देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी

अभंग ९१

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥

प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥

आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥

बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥

दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥

मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥

होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥

तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥

अर्थ :- एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकतांना एक धनगर स्फुंदुन   स्फुंदुन रडत असे ।।1।।

लोकांना वाटे, तो पुरानीकांनवरील श्रद्धेमुळे राड़तो आहे, पण त्याला पुरानीकांची दाढ़ी पाहुन आपल्या बोकदयाची आठवां येत असे ।।ध्रु।।

त्याला बोकदयाचे खुर, पाय आठवत असत ।।2।।

इतर सर्व शेळ्यांन मधे हां एकच बोकड़ा होता ।।3।।

पुरानीकांनी माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केलि की त्याला वाते, बोकदाडाचि दोन शिंदे, चार वेदांसाठी त्यांनी च्यार बोते वर केलि की त्याला वाते, बोकड़याचे चार पाय; या साठी या खुना आहेत ।।4।।

धनगराला मेलेल्या बोकदयाची आठवां येत असे ।।5।।

तुरानीकांना पाहुन ढंगराला मेलेला बोकड अठवला, हां त्याच्या मनातील भाव शेवटी बाहर पडला ।।6।।

तुकोबा म्हणतात, प्रपंचिक मनुष्याच्या अंत:करणात काही मपुन राहत नाही, सत्य बाहर पड़ते ।।7।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा