रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५४नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर

अभंग

नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥

नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥

तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥

अर्थ :- मी गाणे जानत नाही, माझा कंठ सुस्वर नाही; पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे ।।1।।

कोटा राग गांयासाठी कोणती वेळ, काळ योग्य की अयोग्य मी हे जानत नाही; पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतरेजनांची आवश्यकता नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा