शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

७९काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा

अभंग ७९

काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥१॥

कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥

आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥२॥

तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥३॥

अर्थ :- सूर्योदयासमयी कोबड़ा आरवतो व त्यासमायी सूर्य उदयाला येतो, म्हणून कोबड्याने सूर्योदय घडउन अनला, असे होत नाही ।।1।।

माझी योग्यता नसताना हे विठ्ठला, तू मला हा संतपनाचा भार का दिला आहेस ? ।।ध्रु।।

एखादी श्रीमंत व्यक्ति दासिच्या अडविन्याने उपाशी राहणार आहे काय ? ।।2।।

तुकोबा म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या आधीन आहे ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा