शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

६९भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग

अभंग ६९

भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥

ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥

देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥

तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥३॥

अर्थ -: देहातील राहून प्रपंच्यातील विषयभोग भोगले त्याचे त्यागत रूपांतर होते, पण अविचाराने भोगायचा त्याग केला तरी तो सफल होत नाही ।।1।।

पर्मार्थाचे रहस्य असे प्रपंच्याच्य विरुद्ध असते, धर्मामधेच अधर्म लपलेला असतो ।।ध्रु।।

ज्या कर्मामुळे परमेश्वर व् भक्त यांच्यामध्दे द्वैतभाव निर्माण होतो, ती सर्व पपकर्मे ठरतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, शुध्द अतःकरणाने भिड़ेचा सर्व त्याग करावा म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून जीवन सार्थक होते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा