रविवार, २ ऑगस्ट, २०१५

६०दानें कांपे हात

अभंग ६०

दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥१॥

कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥

न वजती पाप । तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥

तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥३॥

अर्थ :- ज्याचा हात दानासाठी थरथर कापतो व् ज्याला दानधर्म करण्याचा सल्ला दिला तर अवडत नाही ।।1।।

ज्याला फक्त चावट पाण्याचे बोल आवडतात, जसे दुधात हींग घातले असता ते पाया जाते, तसे त्याचे भाषण ढोंगिपणाचे असते ।।ध्रु।।

ज्याचे पाय तीर्थ यात्रेला वळत नाहीत; कारण तो गरीब, दरिद्रयाचे ढोंग करतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला मनापासून वाटत नसेल तर ती गोष्ठ त्यांच्या हातून कधीच घडत नाही ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा