रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३१योगाचे ते भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें

अभंग३१

योगाचे ते भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ।।1।।

अवघि मान्ये येति घरा । देव सयरा झालिया ।।2।।

मिरासिचें म्हणू सेत । नाहीं देत पिक उगें ।।3।।

तुका म्हणे उचित जाना । उगी सीना कशाला ।।4।।

अर्थ :-
जो इंद्रियांचे दमन करतो , ज्याच्या चित्तामधे क्षमा असते तो योगी असतो ।।1।।

त्या मुले देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ति होते ।।2।।

ज्या प्रमाणे स्वताच्या शेतातसुधा कष्ट केल्याशिवाय पिक येत नाही ।।3।।

म्हणून तुकोबा म्हणतात , योग्य अयोग्य जानून घ्या , नाहीतर वृथा शिन होईल।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा