रविवार, २ ऑगस्ट, २०१५

२५माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा

अभंग २५

माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥

भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥

टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥

यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥

अर्थ :- संत-सज्जनांमुळे मझ्यातील मी पण लयास गेले आहे ।।1।।

कारण प्रपंच्यातील विषयभोग आम्ही भोगत नसून, आमच्या हृदयतील परमेश्वर भोगत असतो ।।ध्रु।।

त्या मुळे जीवनातील कर्म-कुकर्मचि चिंता उरली नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा