शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

८४मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे

अभंग ८४

मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥

हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥

शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥२॥

आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥३॥

अर्थ :- परामर्थमार्गात अहंकार निर्माण करणारे वृथा मान, अभिमान गुंधळून ठेवावे ।।1।।

चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे ।।ध्रु।।

जेथे शांति असते तेथे काळही थांबतो ।।2।।

प्रपंच्यातील सर्व कामविकारांच्या उर्मि शांतपणे सहन करने म्हणजे परमार्थमार्गाची वाटचाल करने होय, असे तुकोबा म्हणतात ।।3।।.

२ टिप्पण्या: