रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३७पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे

अभंग ३७

पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥

न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥

बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥

संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥

खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥

तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥

अर्थ :- वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाने परस्त्रीला मातेसमान मंल्याने कोनतेही नुकसान होत नाही ।।1।।

परनिंदा, परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होत नाहीत ।।ध्रु।।

एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्याच प्रकारचे श्रम लगत नाही।।2।।

संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो; त्यात तुमचे नुकसान मात्र काहीच होत नाही ।।3।। सत्य बोलन्यासाठीसुद्धा काहीच कष्ट पड़त नाही ।।4।। तुकोबा म्हणतात अशा शुद्ध आचरनाने देह-बुद्धि परमेश्वराशी जोड़लि जाते, त्याला इतर कर्माचि आवशकता भासत नाही।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा