शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना

अभंग १५

हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥

कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥२॥

ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥

तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥

अर्थ :- हरिचे नामस्मरण करने, भक्ति करने हे तुझ्या मनात का बरे येत नाही? ।।1।।

या संसारामधे तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघनार नाही ।।ध्रु।।

ज्यांच्यासाथी तू आपले आयूष्य व्यर्थ घालवित आहे, ते तुला शेवट पर्यंत साथ देणार नाहीत ।।2।।

म्हणून तुकोबा म्हणतात, की तू आपल्या जीवनाचे सार्थक कश्यामधे आहे याचा विचार कर ।।3।।

।।राम कृष्ण हरी।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा