गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

१०१घरीं रांडा पोरें मरती उपवासीं

अभंग १०१

घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥

नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥

तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥

अर्थ :- समाज्यात कही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशि असतात; पण बाहर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात ।।1।।

कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोड़ चुकवितात ।।ध्रु।।

तुकोबा म्हणतात, अश्या माणसांचा दंभिकपना आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही ।।2।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा