रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३९चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें

अभंग ३९

चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥१॥

बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥

मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥

तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥

अर्थ :- चित्त समाधान असल तर सोनेसुधा विशासमान भासते ।।1।।

विषयलोलुपता जीवनाला घातक ठरते, ते तुम्ही विचारी गृहस्त जानता।।ध्रु।।

मनामध्ये प्रपंच्यावियीची भोगलालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या उटिनेही कमी होत नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, प्रपंच्याविषयी आसक्ति असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरि तो मनुष्य असंतृष्ट राहतो।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा