गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

१०५शुकसनकादिकीं उभारिला बाहो

गाथा अभंग १०५

शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥

उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥

त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥

तुका म्हणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥

अर्थ :- शुक-सनकादिक वृषिणी तपस्या केलि, पण परिक्षितिला मात्र त्याच्या साधनेमुळे सात दिवसांत भेट दिली ।।1।।

तसे तुम्ही उठता-बसता हरिनाम स्मरण करा, मग डी3वालाहै तुमच्या भेटिसाठी धीर धरणार नाही ।।ध्रु।।

द्रोपदीच्या आर्त मनाने केलेला धावा एकूण गरुङ्गति मंद आहे, हे जानवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले ।।2।।

तुकोबा म्हणतात, आपल्यावर नीतांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटन्याची आतुरता देवाला लागलेली आहे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा