रविवार, २ ऑगस्ट, २०१५

२६सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा

अभंग २६

सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥

निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥

मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥

तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥

मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥

हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥२॥

तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥

तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥

अर्थ:- मानवी शरीरातील अहंकार, आशा, निंदा, कपट, देहबुद्धि जर लय पावली असेल तर मानवी शारीर हे सकल कामनापूर्ति करणारे चिंतामणि आहे ।।1।।

वारानाशि हे तीर्थ मोक्षासाठी प्रसिद्ध आहे, पण ज्याचे मन आणी शारीर स्पटीकप्रमाणे शुद्ध झाले आहे, त्याला या तीर्थ यत्रैची अवक्षकता नाही. तोच तीर्थाचा तीर्थ होतो आणि लोक त्याच्याजवाळ येतात ।।ध्रु।।

ज्याचे मन शुद्ध आहे, त्याला तुळशीच्या माळांची गरज नाही, तो हरिभक्तीच्या अभूषणांनी सजलेला असतो, भक्तीच्या आनंदात डूबत असतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, त्याने तन, मन, धन विठ्ठल चरणी अर्पण केले आहे, त्याच्या आशा-आकांक्षा लयला गेलेल्या आहेत, तो परिसा पेक्षा श्रेष्ट आहे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा