रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३४सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ

अभंग ३४

सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥

त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥

कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥

नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥

अर्थ :- ज्याच्या चित्तामधे प्रपंच्याची सतत हळहळ, तळमळ चालु असते, ।।1।।

त्याचे मला दर्शनहि होउ नये, तो जिवंत असोंनही मेल्यासारखा आहे।।ध्रु।।

ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द, अश्लील शब्द असतात, ती अमंगल वाणी माझ्या कानी पडू नये ।।2।।

जो दुसरयाशि कधीच चांगल बोलत नाही, जो कोनावाहि उपकार करात नाही, अश्या मनुष्याचे दर्शन घेण्याची माजी इछया नाही, असे तुकोबा म्हणतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा