शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

गाथा अभंग १४

ाथा अभंग १

अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥१॥

नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥

विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥२॥

तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३।।

अर्थ :-जगामद्धे अवगुण लोकांची नेहमी फजीति होत असते ।।1।।

धातुचे भांडे चांगले की वाइट हे पहण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पहावे ।।ध्रु।।

विष तांब्याच्या वाटित जरी भरले तरी त्याचे सेवन करने हे अयोग्य आहे ।।2।।

त्याप्रमाणे मनातील प्रमेश्वराविशिचा शुद्ध भाव महत्वाचा आहे, त्याचे सोंग घेऊ नये असे तुकाराम महाराज म्हणतात ।।3।।

।।राम कृष्ण हरी।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा