रविवार, २ ऑगस्ट, २०१५

५३देखोनि हरखली अंड

अभंग ५३

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥

जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥

भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्टुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥

दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषद्धि तो ॥३॥

अर्थ :- आपुल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली ; पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला ।।1।।

तो जिकडे जाइ तिकडी3 लोकांना पीड़ा देत असे, त्यामुळे लुक त्याला त्रासले होते, त्याच्या आईने मोठी चूक केलि की तिने जन्मतच त्याला मरून टाकले नाही ।।ध्रु।।

ज्याच्या देहभाराने भूमि थरथर कापते ल, जो दुसर्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक  नरकाचे रूप आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, तो दुराचारी, चांडाळ असून पापालासुधा तय ह्या संगती विटाळ होतो, अशा कलप्रवृत्तिचा धिक्कार असो ।।3।।   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा