रविवार, २ ऑगस्ट, २०१५

४८एकादशीव्रत सोमवार न करिती

अभंग ४८

एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥१॥

काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥

हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥

तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥३॥

अर्थ:- जो मनुष्य सोमवार, एकादशी करीत नाही तो अंती कोणत्या गठीला जाईल माहित नाही ।।1।।

अश्या कर्मकांडने आंधळ्या झालेल्या लोकांची तुकाराम महाराजाना काळजी वाटते ।।ध्रु।।

जे हरी-हरांमधे फरक करतात , त्यांची शेवटी गति कशी असेल ? ।।2।।

ज्यांची नारायनावर श्रधा, भक्ति नाही, ते अंति कोणत्या गठीला जातील, अशी चिंता तुकोबांना वाटते ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा