गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

१०३येऊं द्या जी कांहीं वेसकरास

१०३

येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥

जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥

तुका म्हणे उद्यां लावीन म्हनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥३॥

अर्थ :- यमाचा एक प्रेषित वेसकराच्या रूपाने, कधीही दानधर्म न करणाऱ्या, हरिनाम न घेणाऱ्या, सदैव संसारात आसक्त असणाऱ्या मांणसास उपदेश करतो. 'अहो, मायबापहो, वेसकरासाठी कही पक्कन्नाचा, हरिनामाचा, दांधर्मचा घास अपल्याघरातून बाहर येउ द्या ।।1।।

मी जेव्हा-जेव्हा येथे येतो, तेव्हा-तेव्हा (तुम्ही काहीतरी कामत व्यग्र असतात); तुमचा हात रिकामा नासतोच, कधीतरी काहीतरी द्यावे, घ्यावे हे चांगले असते ।।ध्रु।।

तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या देहरूपी गावाचा मनरूपी दरवाजा मी उद्या बंद करिन. मग तुम्ही पशु-पक्षाच्या देहाच्या दारासभोति फिरत राहल (जन्ममृत्युच्या फेऱ्यात फिरत राहल ) मायबापा ! ।।2।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा