रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३८शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं

अभंग३८

शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥

मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥

सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥

तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥

अर्थ :- बिज शुद्ध असले तर येणारे फल पण उत्तम निपजते ।।1।।

ज्याच्या मुखी हरिणामामृत असते, त्या मधुर वानीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो ।।ध्रु।।

जो देह-चित्त-बुद्धिने निर्मळ आहे, त्याचे चित्त गंगाजलाप्रमाने पवित्र असते।।2।।

तुकोबा म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणी जीव विसावा घेउ शकतो।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा