गाथा अभंग ३४४
सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
अर्थ :- मी परमार्थामधुन निघनारा रस पीतो आणि तुम्हाला पण वाटतो, प्रपंच्याच्या रानावानात भटकू नका, मझ्याप्रमाने हा ब्रह्मरस प्या आणि आनंदित व्हा ।।1।।
जो विटेवर समचरन ठेवून उभा आहे, तो दाता आहे, त्यानेच हा रस मला दिला आहे ।।ध्रु।।
याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून रहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होतील ।।2।।
तुकोबा म्हणतात, मी त्याचा निरोप्या आहे, तुम्हासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा