मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३५५न सोडीं न सोडीं न सोडीं

मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली - अभंग ॥५॥

गाथा अभंग ३५५

न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥१॥

भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥

शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥२॥

तुका म्हणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥३॥

अर्थ :- विठ्ठोबा, मी तुझे चरण नाही सोडणार ।।1।।

माझ्यावर कितीही मोठे संकट आले, जीवावर बेताले तरी मी तुझे चरण कदापि नाही सोडणार ।।ध्रु।।

शस्त्राच्या धारणे माझ्या श्रीराचे शंभर टुकड़े केले तरीही मी घाबरणार नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, आधिपासून मी बुद्धीला येणाऱ्या संकटांनविषयीची जाणीव देऊन सावध केले आहे ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा