तुकोबांस मंबाजीने मारले, त्या वेळी केलेला देवाचा धावा
गाथा अभंग ३५९
सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥१॥
तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥
कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आम्ही जातां ॥२॥
तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥
अर्थ :- अनंता, मला दुःखातुन, यतनांमधुन सोडवा हो, सोंडवा. तुमच्या शिवाय दूसरा प्राणदाता कोण आहे ? ।।1।।
तुम्हाला टाकून आम्ही इतरांना शरण गेलो, तर कोणाला लाज वाटणार बरे ? ।।2।।
(यासाठी) तुकाराम महाराज म्हणतात, हे सख्या, रुक्मिनिकांता, मला या जाचातुन सोडव ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा