गाथा अभंग ३३३
एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥
बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥
दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥
तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥३॥
अर्थ :- एखादा मनुष्य अडानिपनामुळे फजीती करून घेतो, तर दूसरा ज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडून जातो ।।1।।
एक वेडा आती बड़बड़ करतो, तर दुसरा मुका आहे; त्यामुळे दोघांचाहि उपयोग नाही ।।ध्रु
एक विद्या-अविध्येच्या द्वद्वात् सापडल्यामुळे त्याला 'इकडे आड़-तिकडे विहीर' अशी परिस्तिति प्राप्त होते ।।2।।
तुकोबा म्हणतात, तुझे पापकर्म तुला परमार्थाचे सत्य ज्ञान कळू देत नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा