मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३६४शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे

गाथा अभंग ३६४

शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥१॥

येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ध्रु.॥

करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥२॥

तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥३॥

अर्थ :- एखाद्या गोष्टीचा शोक केला तर तो वाढतच जातो, त्याकारता धीर धरला पाहिजे, हिंमत ठेवली पाहिजे ।।1।।

या मानवी जीवनात कोणतीही गोष्ट न घडण्यासारखि नाही. येथे भित्रेपना वाइट आहे ।।ध्रु।।

परमार्थ करण्यास तुम्ही सहाय्य कराल काय? हा प्रश्न कित्तेकांना विचारला असता ते म्हणतात,  करू हो! असे केवळ हो म्हणनारे लोक खुप आहे ; पण प्रत्यक्ष मदतीला धाउन येणारे लोक कमी आहेत ।।2।।

तुकोबा म्हणतात, या क्षणभंगुर जीवनात भक्तिचा एक जरी क्षण साधला तरी जीवन सफल होईल ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा