मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

३५१आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव

गाथा अभंग ३५१

आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥१॥

करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥

श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥२॥

तुका म्हणे ऐसा । सटवे चि ना पांचा दिसां ॥३॥

अर्थ :- ज्याचे आचरण शुद्ध नाही, ज्याच्या मनात देवाविषयी भक्ति-श्रद्ध नाही ।।1।।

असे मुर्ख पंडित इतरांच्या शुद्ध आचरणात दोष काढतात व त्यांच्बा घात करतात ।।ध्रु।।

ते मिष्टान्नाला शिवून विटाळ करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, ऐसा पाखण्डी इतके दिवस जिवंत कसा राहिला? पाच दिवसांतच कसा मेला नाही ? ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा