रविवार, २० सप्टेंबर, २०१५

१४९कृष्ण गोकुळीं जन्मला

विटीदांडू अभंग

अभंग१४९

कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥

होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥

प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥२॥

तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥

अर्थ :- कृष्ण गोकुळात जन्माला आहे, हे ऐकून दृष्ट कंसाला चळकाप सुटला ।।1।।

कृष्णनाचा अवतार झाला आणि सर्व लोक आनंदी झाले ।।ध्रु।।

ते सारखे मयखाने त्याचे नाव घेऊ लागले व आनंदाने नाचू लागले ।।2।।

तुलाराम महाराज म्हणतात, आनंदाने कृष्णचे नामघोष केल्याने सर्व दोष नाहीस होतात ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा