काला आणि खेळ अभंग ११८
हारस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥
काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥२॥
जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥३॥
अर्थ :- हरिनामाचा जयघोष करण्याच्या भक्तिरसात मोठा आनंद भरलेला आहे. जो भाग्यवान असेल, त्याच्या वाटेल तो येईल ।।1।।
अनेक जन्माच्या पुण्याई असलेला भक्तिचा अधिकारी होईल ।।ध्रु।।
अरे बंधुनो, नुसते बघत राहु नका. आता ओळ करा आणि आनंदाने नामाच्या छंदात नाचा. भक्तिरसाने मन तृप्त् होईपर्यंत त्याहे सेवन करा. त्यात संकोच करू नका ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हरिच्या सगुन रूपाच्या दर्शनाने सुख अंत:कर्णात ठसेल . कलिकाळहि त्याच्यापुढे हतबल आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा