अभंग कोड़ें ११६
कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥१॥
पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ध्रु.॥
सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें ज्यवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥२॥
तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥३॥
अर्थ:- हे कोड़े तुम्ही एका. थोडेफार देहादि प्रपंचाच्या मोहपाश्यात तुम्ही गुंतले आहात, ते नष्ट करुण टाका ।।1।।
या जगात 'माझे' काय आहे ते सांगा. त्या बद्दल रागाउ नका. ज्याला हे कोड उलगडत नाही, तो मायरूपि मातेशी समागम करणारा, हिन आहे ।।ध्रु।।
तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, देह, स्त्री, पुत्र, धनदौलत हे असो अथवा नसो, नाशिबाच्या हाती असल्यामुळे त्याविषयि मनात कोणतीही खंत बाळगु नये ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, सर्व लोकांनी देहभान सोडून आपल्यावर कोणताही अपवाद येऊ देऊ नका ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा