काला आणि खेळ अभंग१२२
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्या ॥१॥
देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरि मेळीं ॥ध्रु.॥
आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥२॥
भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥३॥
मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥४॥
एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रम्हानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥५॥
अर्थ :- आपापले काम अतोपुन सर्व गोपाळ एका ठिकानी जमले. आता जेवनाची वेळ झाली. आपल्या शिदोर्या आना ।।1।।
सर्वांनी आपापल्या पनपुण्याचा हिशोब त्याच्याजवाल दिला इंद्रियरूपि गाईना अंत:करनिरूपि गोठ्यात बसविले. हरिच्या सोबत दोंदिल, बोबङा, वाकदया, पेंद्द्या, वड़ज्या या नावाचे गोपाळ होते ।।ध्रु।।
आपल्या आवडिप्रमाने त्यांनी पंगतित मुद्रा बांदल्या. हरिन आपली आवडती शिदोरि खोलुन त्यात स्वतचि गोड़ी मिळवली ।।2।।
पाप-पुन्यात्मक शिदोरिचा भार त्यांनी शुद्ध भावभक्तिसमुदायाचा योग आला नव्हता तो पर्यन्त आपल्या माथि वागविला. परमार्थ लक्षणाचा योग सगळ्यांच्या ठिकाणी आला पाहुन श्रीहरींनी सर्वांच्या पाप-पुण्याची शिदोर्यांची ओझि उतरविलि ।।3।।
जो घाइने, उताविलापनाने मागतो, त्याच्यावर बाकीचे सवंगदि रागवतत व् त्याला म्हणतात, मला मिळेल की नाही'? अशी खोटी भावना मनात का ठेवतोस ? ।।4।।
त्यांचा एकमेकांशी जो सौवाद झाला, त्याने ते गोपाळ ब्रम्हनंदात तृप् झाले. तुकोबा म्हणतात, ते गोपाळ म्हणू लागले, या रे या, आपण सारेजन श्रीहरिच्या चरणांना वंदन करुया ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा