काला अभंग
गाथा अभंग१३९
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥
तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥
वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥
तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३॥
अर्थ :- गोरसाचे शिंकाळ फार उंच लावले आहे. त्यात हात घालन्यास मी तुम्ह तिघांच्या खांद्यावर चढतो ।।1।।
गड्यांनो, तुम्ही आपले दोन बाजूंना तोड़ उघडून नीट उभे रहा ।।ध्रु।।
दोन्ही कोपर्यातून शिंक्यातिल धारा वहतील, त्या धारा नीट तोंडात घाला ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हाताकडे लक्ष दया. सर्वांना मी सारखे देणार आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा