अभंग ११३
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥२॥
तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥३॥
अर्थ :- वाइट कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा स्वत:च्या पत्नीवरहि विशवास नसतो, तिच्या भावावरहि नसतो, म्हणून तो तिला तिच्या भावाबरोबर माहरी पाठवित नाही ।।1।।
चोरी करणाऱ्याला इतर व्यक्ती चोरच वाटतात ।।2।।
तुकोबा म्हणतात, ज्याच्या मनात जैसा भाव असेल तसेच त्याला जग दिसते ।।3।।.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा