रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

२२३हा गे माझे हातीं

काला अभंग

गाथा अभंग २२३

हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥१॥

देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ध्रु.॥

धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोट ॥२॥

तुका म्हणे घरीं । मग कैं जी या परी ॥३॥

अर्थ :- हा पहा, माझ्या हातात काल्याचा घास आहे ।।1।।

भगवंताने जो वाटा मला दिला, तो मी सेवन करत आहे. तुम्हालाही घास हवा असेल तर त्याच्या माघे धावा ।।ध्रु।।

पोट या प्रकारे भरले आणि वर बोभाटाहि करीत आहे ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, अरे गोपालांनो , घरी बसून राहिलात तर या प्रकारचा (आनंददायी) भोजनाचे घास कसे बरे मिळणार ? ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा